राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे आजपासून प्रचार रॅलीत

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदासंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या दुसऱ्या टप्यातील प्रचाराला आजपासून सुरुवात झाली आहे. ठाणे शहरात मनसेचे अविनाश जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र सद्या पहायला मिळत असताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही वाचविण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेने आज अविनाश जाधव यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच आजपासून पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष विजय घाटे स्वतः प्रचार रॅलीत सहभाग घेणार आहे. आज मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात रिपब्लिकन बहुजन सेनेने आपल्या पाठिंबाचे पत्र अविनाश जाधव यांना दिले.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. या मतदारसंघात गेल्या १० वर्षात हवी तशी विकासकामे झाली नाहीत, तसेच या मतदार संघाचे आमदार आमच्याकडे कधी फिरकतच नसल्याचा आरोप स्वतः मतदार करत असून यंदा आम्ही नक्कीच बदल करू असे आश्वासन नागरिकांकडून केले जात आहे. असे असताना २४ तास २४ तासात काम करणाऱ्या जाधव यांना फक्त एक संधी द्या असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारी रिपब्लिकन बहूजन सेना देखील अविनाश जाधव यांच्या ठामपणे पाठीशी उभी असल्याचा विश्र्वास घाटे यांनी दिली.

निवडून आल्यानंतरही असेच २४ तास जनतेसाठी धावून या

विधानसभा निवडणुक २०२४ साठी बिनशर्त पाठींबा जाहीर करत असताना राष्ट्रिय अध्यक्ष विजय घाटे यांनी मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना विजयाच्या शुभेच्या दिल्या. अन्याय किंवा मदतीसाठी जसे धावून जाता तसेच निवडून आल्यानंतरही असेच २४ तास जनतेसाठी देतील असा विश्र्वास देखील घाटे यांनी यावेळी ठाणेकरांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *