राहुल गांधीसह, प्रियंका,खरगें, पायल, रेवंता रेड्डी, सिद्धरामय्यांच्या सभा
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी काँग्रेसने मेगाप्लान आखला आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या ६ दिवसांत कांग्रेसचे राष्ट्रीय आणि राज्यातील बडे नेते सुमारे नव्वद सभा घेणार आहेत. यांपैकी राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे , सचिन पायलट, रेवंता रेड्डी, सिद्धरामय्या यांच्या सभा होणार आहेत.
यात, राहुल गांधी यांच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ६ सभा होणार आहेत. प्रियांका गांधी बुधवारपासून महाराष्ट्रात चार सभा घेणार आहेत. तर काँग्रेसाध्यक्ष खर्गे दहा सभा घेणार आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर काँग्रेसचे विशेष लक्ष असेल.
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांपैकी इम्रान प्रतापगढी यांच्या वीसहून अधिक, सचिन पायलट यांच्या सुमारे आठ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले २० तर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात १५ सभा घेणार आहेत. याशिवाय, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील प्रचारात दिसणार आहेत. महत्वाचे म्हणजे, १७ नोव्हेंबरला मुंबईत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची संयुक्त सभाही होऊ शकते.
काँग्रेसने महा विकास अघाडीने दिलेल्या पाच मोठ्या आश्वासनांचे गॅरंटी कार्ड ५ कोटी घरांपर्यंत पोचवण्याचे टरवले आहे. यासाठी डोर टू डोर अभियान चलवले जात आहे.
