अनिल ठाणेकर
ठाणे : संजय केळकर यांनी समाजातील सर्व घटकांसाठी आजवर भरीव कार्य केले असून ते एकनिष्ठ व एकवचनी आमदार म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या या कार्यामुळे विधानसभा निवडणुकीत तेली समाजसह नामदेव शिंपी समाजाने त्यांना पाठिंबा दिला आहे.
ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात तिसऱ्यांदा विजयाची हट्रिक करण्यासाठी भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून संजय केळकर रिंगणात उतरले आहे. मॉर्निंगवॉक, चौक सभा, प्रचार दौरे यामध्ये केळकर यांनी खऱ्या अर्थाने प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना समर्थन देणाऱ्या संस्था आणि नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. त्यानुसार ठाणे शहर विधानसभेचे आमदार म्हणून काम करत असताना केळकर यांनी सर्व सामान्यांमधील अगदी कुठल्याही समाजाच्या किंवा अतिसामान्य व्यक्तिला तसेच कुणासही तितक्याच तन्मयतेने महत्व देता व त्याला कुठल्याही प्रकारे मदत करण्यास तत्परतेने अगदी घरातीलच व्यक्ती असावी असे रात्री अपरात्री सुध्दा धावून जात असतात. केळकर यांच्या याच कार्यशैलीमुळे व पक्षासोबत एकनिष्ठ, एकवचनी दोनवेळा विधानसभा आमदार म्हणून निवडून आला आहात. तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून विधासनसभेत पाठविण्यासाठी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे ठाणे शहरातील सर्व समाज व ज्ञातीमधील सर्व बंधू-भगिनी आपणास पाठिंबा व्यक्त करून या लेखी निवेदनाद्वारे आपणांस सुयश चिंतून आपण पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून यावेत म्हणून शुभेच्छा प्रकट करीत असल्याचे पाठिंबा पत्रात म्हंटले आहे. तर दुसरीकडे तेली समाजाने देखील केळकर यांचे समाजातील कार्याची दखल घेत, त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *