-आजपासून महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा

 

मुंबई : ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) अंतर्गत एनएससीआय आयोजित 14 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार्‍या योनेक्स सनराइज-महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तनय मेहेंदळे, शिवानी हेर्लेकरला अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीमध्ये पहिले सीडिंग देण्यात आले आहे.
पुरुष एकेरीत श्वेतांक कर्णिक आणि यश तिवारी आणि सोहम फाटकला अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन आहे. महिलांच्या एकेरीच्या स्पर्धेत श्रद्धा हाके, मनस्वी वैद्य आणि नेत्रा झालानीचा अव्वल चार सीडेड खेळाडूंमध्ये समावेश आहे. तनयला 17 वर्षांखालील मुले एकेरीतही टॉप सीडिंग मिळाले आहे. मुली गटात श्रावणी पाटीलला अव्वल मानांकन आहे.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) मान्यतेने होणारी ही स्पर्धा विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील 940 खेळाडूंनी त्यांचा सहभाग निश्चित केला आहे.
सीडिंग्स – 17 वर्षांखालील मुली एकेरी गट: 1. श्रावणी पाटील, 2. प्रिशा शहा, 3. नेत्रा झालानी, 4. खुशी पाहवा.
17 वर्षांखालील मुले एकेरी गट: 1. तनय मेहेंदळे, 2. हर्षित माहीमकर, 3. इशान वानखेडे, 4. निधिश मोरे.
महिला एकेरी: 1. शिवानी हेर्लेकर, 2. श्रद्धा हाक्के, 3. मनस्वी वैद्य, 4. नेत्रा झालानी.
पुरुष एकेरी: 1. तनय मेहेंदळे, 2. श्वेतांक कर्णिक, 3. यश तिवारी, 4. सोहम फाटक.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *