अनिल ठाणेकर /अरविंद जोशी

ठाणे : ओवळा माजिवडा १४६ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक चौथ्यांदा उभे राहिले आहेत. त्यांना दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत आहे असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

प्रताप सरनाईक यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांनी मिरारोड येथील एस. के. स्टोन मैदानात आज प्रचार सभा केली. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचार अधिक प्रभावी झाल्याचे दिसून आले. या सभेची राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली आहे. योगी आदित्यनाथ यांनी मिरारोड येथील सभेत प्रताप सरनाईक यांच्या विकासकामांचा गौरव केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी सर्वांना एकत्र राहून विधानसभा २०२४ महायुतीची ताकद दाखवा तसेच २० नोव्हेंबर रोजी शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन केले.

ओवळा माजिवडा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबदद्ल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथ जी यांचे आभार प्रताप सरनाईक यांनी मानले. योगी आदित्यनाथ जी यांनी सांगितल्या प्रमाणे आपण सर्व एकत्रित राहिलो तर विधानसभेवर भगवा नक्की फडकेल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त करत येत्या २० नोव्हेंबरला अनुक्रमांक २ वरील निशाणी धनुष्यबाणासमोरील बटण दाबून बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन केले. या सभेत मिरा भाईंदर शहरातील नागरिक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *