ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (समाजविकास) अनघा कदम, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि ठाणेकर नागरिक उपस्थित होते.
