मेहेंदळे, कर्णिक तिसऱ्या फेरीत
मुंबई : अग्रमानांकित तनय मेहेंदळेसह दुसरा मानांकित श्वेतांक कर्णिकने ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशनच्या (जीएमबीए) संयुक्त विद्यमाने एनएससीआय आयोजित योनेक्स सनराइज-महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब कोर्टवर पहिल्या दिवशी गुरुवारी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात मेहेंदळेने शिवम चौरेचे आव्हान 21 मिनिटांत 30-19 असे मोडीत काढले. बाजूच्या कोर्टवर कर्णिकने अरित्रा सरकारविरुद्ध 11 मिनिटांत 30-7 असा विजय मिळवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
युवा हर्षित माहीमकरने कनिष्क गुर्रमचा १७ मिनिटांत ३०-२३ असा पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या लढतीत, अनय पिंगुळकरने यश भोंगळेला 17 मिनिटांत 30-28 असे रोखले. पियुष कांबळेने सुमीत माडेवर 23 मिनिटांत 30-28 अशी मात केली.
पुरुष एकेरी (फेरी-1): 1-तनय मेहेंदळे विजयी वि. शिवम चौरे 30-19;
2-श्वेतांक कर्णिक विजयी वि. अरित्र सरकार 30-7;
सोहम पाटील विजयी वि. सार्थक कुलकर्णी ३०-२५;
अभिनव सिंग विजयी वि. अभिषेक भागवत ३०-२५;
अनय पिंगुळकर विजयी वि. यश भोंगळे ३०-२८;
देवम देसाई विजयी वि. अनुप रत्नपारखी 30-25;
चिरायू भोबू विजयी वि. सागर डेकाटे ३०-२७;
ओम महाजन विजयी वि. सार्थक वाडेकर ३०-२६;
सलाज मेघराज विजयी वि. आदित्य शर्मा ३०-२६;
हर्षित माहिमकर विजयी वि. कनिष्क गुर्रम 30-23;
आर्यन वर्मा विजयी वि. विनित शेलार 30-27;
दारस नाडर विजयी वि. अयान कुलकर्णी 30-27;
पियुष कांबळे विजयी वि. सुमीत माडे ३०-२८;
निखिल चारी विजयी वि. कृष्णा भट्टड 30-26.
0000