मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी राज्यव्यापी दौरा केला. या दौत्यामध्ये त्यांनी १६ जिल्ह्यातील ३५ मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार, यांच्या बैठका, संवाद, सभा, तसेच पत्रकार परिषद घेत संपर्क साधला, या दौऱ्यामध्ये त्यांना मतदार व कार्यकर्ते यांचा लाभलेला प्रतिसाद व महायुतीच्या सरकारने जनतेच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवल्याने महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. देशात व राज्यात जनता दल सेक्युलर पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्याने जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी राज्यातील अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पालघर, मुंबई, व सोलापूर आदी जिल्ह्याचा दौरा केला. या दौत्यात त्यांनी प्रत्यक्ष मतदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेतल्या. महायुतीच्या सरकारने राज्यात राबविलेल्या लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना विज बिल माफी, सुशिक्षित तरुणांना रोजगार, परदेशी शिष्यवृत्ती शिक्षण योजना, वृद्ध पेन्शन योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, आरोग्य योजना, अशा विविध योजनांमुळे महायुतीच्या सरकारबद्दल जनतेमध्ये सहानुभूतीचे वातावरण असल्याचे शेवाळे यांनी सांगितले तसेच राज्यातील जनता दलाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मा. पंतप्रधान व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय एच. डी. देवेगौडा साहेब यांच्या आदेशाचे पालन करून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन श्री. शेवाळे यांनी केले आहे. यावेळी मुंबई प्रदेश कार्यालय येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेसाठी प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे,प्रदेश कार्याध्यक्ष सुरेंद्रकुमार वाजपेयी,

 

मुंबई शहराध्यक्ष प्रभाकर नारकर,मुंबई कार्याध्यक्ष सलीम भाटी, उपाध्यक्ष सुहास बने, प्रदेश सरचिटणीस निलेश कंथारीया, रायगड जिल्हा अध्यक्ष भगवान साळवी, प्रदेश सरचिटणीस अॅड. बापूसाहेब देशमुख, मुंबई महिला अध्यक्ष ज्योती बढेकर, गुजराती सेल अध्यक्ष किरण सेठ, पुणे शहर अध्यक्ष नागेश पाटोळे, सह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *