महिला एकेरीतील चार टॉप सीडेड खेळाडूंचे आव्हान संपुष्टात
मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) मान्यतेने तसेच ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीएमबीए) आणि एनएससीआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीतील चार अव्वल मानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले.
विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब कोर्टवर खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत टॉप सीडेड शिवानी हेर्लेकरला बिगरमानांकित अनुष्का भिसेकडून 17 मिनिटांत 29-30 असा पराभव पत्करावा लागला.
उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतींमध्ये, श्रावणी पाटीलने दुसर्या मानांकित श्रद्धा हाक्केचा 15-9, 15-8 अशी सरळ गेममध्ये मात केली. तिसर्या मानांकित मनस्वी वैद्यला बिगरमानांकित देवांशी शिंदेकडून 13-15, 15-2 असा पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी, प्रिशा शाहने दमदार खेळ करताना चौथ्या मानांकित नेत्रा झलानीविरुद्ध पहिला गेम गमावूनही 8-15, 15-7, 15-2 अशी बाजी मारताना उपांत्य फेरीतील स्थानांवर शिक्कामोर्तब केले.
पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये, अव्वल मानांकित तनय मेहेंदळेने मिशिल शाहवर 17-15, 15-11 आणि दुसर्या मानांकित श्वेतांक कर्णिकने पियुष कांबळेवर 15-11, 15-10 असा विजय मिळवला.
युवा खेळाडू हर्षित माहीमकरने सर्वोत्तम कामगिरीत सातत्य राखताना तिसर्या मानांकित यश तिवारीला 15-7, आणि 15-5 असे सरळ गेममध्ये हरवत अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान पटकावले. चौथ्या मानांकित सोहम फाटकने तनय जोशीचा 15-11, 15-8 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
निकाल: महिला एकेरी – उपांत्यपूर्व फेरी: प्रिशा शाह विजयी वि. 4-नेत्रा झालानी 8-15, 15-7, 15-2; अनुष्का भिसे विजयी वि. आर्या फलाने 15-13, 15-4;
श्रावणी पाटील बीटी 2-श्रद्धा हाक्के 15-9, 15-8; देवांशी शिंदे लीं 3-मनस्वी वैद्य 15-13, 15-2.
पुरुष एकेरी – उपांत्यपूर्व फेरी: 2-श्वेतांक कर्णिक विजयी वि. पियुष कांबळे 15-11, 15-10; 4-सोहम फाटक विजयी वि. तनय जोशी 15-11, 15-8; हर्षित माहीमकर विजयी वि. 3-यश तिवारी 15-7, 15-5; 1-तनय मेहेंदळे विजयी वि. मिशिल शहा 17-15, 15-11.
0000
