ठाणे : हर्षित बोबडेच्या दमदार शतकी खेळीनंतरही पहिल्या डावात अवघ्या एका धावेने पिछाडीवर पडल्यामुळे यजमान स्पोर्टिंग क्लब कमिटीला १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या दुसऱ्या शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पर्धेतील प्रवास आटोपता घ्यावा लागला. सनराईझ क्रिकेट क्लबच्या पहिल्या डावातील २३५ धावांना उत्तर देताना स्पोर्टिंग क्लब कमिटीने २३४ धावापर्यत मजल मारली होती.
प्रथम फलंदाजी करताना अर्णव मिरगेच्या ७६ धावांच्या अर्धशतकी खेळीने सनराईझ क्रिकेट क्लबने द्विशतकी धावसंख्या उभारली. तन्मय मालुसरेने चार आणि आर्यन राजने तीन बळी मिळवले. उत्तरादाखल हर्षितने १२३ आणि स्पर्धेत फलंदाजीत छाप पाडणाऱ्या विवान हजारेच्या ४६ धावांच्या खेळीनंतरही स्पोर्टिंग क्लब कमिटीला पहिल्या डावात आघाडी घेता आली नाही. प्रतिस्पर्ध्यांच्या शौर्य नवलेने चार फलंदाज बाद केले. दुसऱ्या डावात सनराईझ क्रिकेट क्लबने २ बाद १०७ धावापर्यत मजल मारली होती.
संक्षिप्त धावफलक : सनराईझ क्रिकेट क्लब : (पहिला डाव) : सर्वबाद २३५ ( अर्णव मिरगे ७६,तन्मय मालुसरे २०-६-६६-४,आर्यन राज १४-६-२२-३). दुसरा डाव : ३६ षटकात २ बाद १०७. विरुद्ध स्पोर्टिंग क्लब कमिटी : सर्वबाद २३४ ( हर्षित बोबडे १२३, विवान हजारे ४६, शौर्य नवले ८.३-१-२७-४). पहिल्या डावतील १ धावेच्या आघाडीमुळे सनराईझ क्रिकेट क्लब विजयी.
