ठाण्याच्या अनुज अग्रवालचा मुंबईच्या राहुल सचदेववर विजय
मुंबई :– ठाण्याचा क्यूईस्ट अनुज अग्रवालने सातत्य राखताना मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात मुंबईच्या राहुल सचदेववर 4-2 असा विजय मिळवला.एमएचसी बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत सोमवारी अग्रवालने 0-1 अशा पिछाडीवरून 31 गुण (तिसरी फ्रेम), 32 (चौथी फ्रेम) आणि 40 (पाचवी) अशा तीन सलग फ्रेम्समध्ये खेळ उंचावताना 61-62, 53-49, 62-22, 58-10, 57-50, 62 57 अशी बाजी मारली. सचदेवने 32 गुणांच्या ब्रेकसह पहिली फ्रेम जिंकली्र. मात्र, तिला सातत्य राखता आले नाही. त्यानंतर त्याला सहावी फ्रेम जिंकता आली. तोवर सामना हातातून निसटला होता.
वाशीच्या गौरव जयसिंघानीने पुण्याचा युवा खेळाडू आरव संचेतीला 4-1 (53-60, 55-49, 45-36, 58-30, 54-12) असे पराभूत केले.
मुंबईच्या सुमेर मागोनेही आपला पहिला फेरीचा सामना जिंकताना प्रतिभाशाली आदित्य शांडिल्यचा (मुंबई) 4-2 (71-9, 55-11, 43-56, 72-20, 49-72, 64-21) असा पराभव केला.
निकाल 15-रेड मेन ड्रॉ (पहिली फेरी): सुमेर मागो (मुंबई) विजयी वि. आदित्य शांडिल्य (मुंबई) 4-2 (71-9, 55-11, 43-56, 72-20, 49-72, 64-21);
अनुज अग्रवाल (ठाणे) विजयी वि. राहुल सचदेव (मुंबई) 4-2 (61-62(32), 53-49, 62(31)-22, 58(32)-10, 57(40)-50, 62-57 (46);
गौरव जयसिंघानी (वाशी) विजयी वि. आरव संचेती (पुणे) 4-1 (53-60, 55-49, 45-36, 58-30, 54-12);
