प्रफुल, आर्याची 15 वर्षांखालील गटाच्या फायनलमध्ये धडक
मुंबई: ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (GMBA) आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (MBA) संयुक्त विद्यमाने कोर्ट चॅम्पियन्स 24 आयोजित एनएससीआय- योनेक्स सनराईज-महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल मानांकित प्रफुल पार्डी आणि आर्या मेस्त्रीने 15 वर्षांखालील मुले आणि मुली एकेरी गटाच्या अंतिम धडक मारली.एनएससीआय कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत 15 वर्षांखालील मुले गट एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रफुलने ध्रुव पवारचा 18 मिनिटांत 21-11, 21 15 असा पराभव केला. अंतिम फेरीत प्रफुलची गाठ दुसऱ्या मानांकित कृती पटेलशी पडेल. त्याने अन्य लढतीत, तिसऱ्या मानांकित शिवम चौरेवर 26 मिनिटांत 21-14, 21-13 अशी मात केली.
मुलींमध्ये, आर्याने चुरशीच्या लढतीत चौथ्या मानांकित अन्विषा घोरपडेचे आव्हान 37 मिनिटांत 21-14, 10-21, 21 13 असे मोडीत काढले. फायनलमध्ये आर्यासमोर खुशी पाहवाचे आव्हान आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात, खुशीने इमान मोटरवालाचा २१-१३, आणि २१-९ असा पराभव केला.
निकाल (सर्व उपांत्य फेरी): 11 वर्षांखालील मुली एकेरी: 1-प्रिया आंबुर्ले विजयी वि. जैस्वाल अनन्या 21-10, 21-9; 2-समिक्षा मिश्रा विजयी वि. 3-रिशा कडियन 21-5, 21-10.
13 वर्षांखालील मुली एकेरी: इमान मोटरवाला विजयी वि. अंजना नायर 12-21, 21-13, 21-15; 2-अन्विषा घोरपडे विजयी वि. 3-रुद्र भगवान गावडे 21-16, 21-13.
15 वर्षांखालील मुली एकेरी: 1-आर्य मेस्त्री विजयी वि. 4-अन्विषा घोरपडे 21-14, 10-21, 21-13; खुशी पाहवा विजयी वि. इमान मोटरवाला 21-13, 21-9.
11 वर्षांखालील मुले एकेरी: 4-अरहम भंडारी विजयी वि. 1-रोनित जाधव 21-18, 22-24, 21-13; २-मेक्कादाथ आल्फी विजयी वि. आदिराज शेट्टी २४-२२, २३-२१.
13 वर्षांखालील मुले एकेरी: 1-रुहान भाटिया विजयी वि. श्लोक आंबेरकर 21-13, 21-14; 2-श्लोक गोयल विजयी वि. तन्मय पाटील 21-15, 21-10.
15 वर्षांखालील मुले एकेरी: 1-प्रफुल पारडी विजयी वि. 4-ध्रुव पवार 21-11, 21-15; 2-कृती पटेल विजयी वि. 3-शिवम चौरे 21-14, 21-13.