ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
