– मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्पर्धा
मुंबई, 19नोव्हेंबर: मुंबईचा अनुभवी खेळाडू हसन बदामीने सातत्य राखताना मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्पर्धेच्या सीनियर 15-रेड स्नूकर प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
मलबार हिल क्लब (एमएचसी) बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत मंगळवारी हसनने नागपूरच्या झुबेर शेखचा 4-1 (69-3, 21-78(59), 62-23, 70(70)-0, 65-52(40) असा पराभव केला.
दुसर्या फेरीच्या अन्य सामन्यात, मंगळवारी अदितने अनुज अग्रवालचा 4-0 (59-6, 63-42, 89 (41)-17, 54-41) असा मोठ्या फरकाने पराभव केला. अन्य लढतीत, गौरवने मुंबईच्या अनुराग बागरीवर 4-2 (38-67, 43-11, 15-53, 62-29, 60-6, 59-56) असा विजय मिळवला.
निकाल – सीनियर गट 15-रेड स्नूकर (पहिली फेरी): अमरदीप घोडके (पुणे) विजयी वि. सुमीत आहुजा (उल्हासनगर) 4-1 (21-67, 67-58, 41-54, 47-73, 62. 42).
जुबेर शेख (नागपूर) विजयी वि. सिद्धार्थ टेंबे (पुणे) 4-2 (63-52, 40-56, 63-23, 60-23, 21-49, 71-59);
दुसरी फेरी: अदित राजा (मुंबई) विजयी वि. अनुज अग्रवाल 4-0 (59-6, 63-42, 89 (41)-17, 54-41) ;
गौरव जयसिंघानी (वाशी) विजयी वि. अनुराग बागरी (मुंबई) 4-2 (38-67, 43-11, 15-53, 62-29, 60-6, 59-56).