मुंबई  ः तृतीयपंथी समाजाला मोठ्या संघर्षातून मतदानाचा हक्क मिळाला आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी  बुधवारी (ता. २०) विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.
तृतीयपंथी समाजाला मतदानाच्या हक्कापासून कित्येक वर्षे वंचित राहावे लागते होते. आपल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात लढा द्यावा लागला होता. मुंबई व उपनगरात मोठ्या संख्येने तृतीयपंथी समाजाचे वास्तव्य आहे. त्यात उपनगरात १,०७६ पेक्षा अधिक तृतीयपंथी राहतात. घाटकोपर, मानखुर्द, मानखुर्द, शिवाजीनगर, सायन कोळीवाडा, धारावी, माहीम, दहिसर, विलेपार्ले, अंधेरी पश्चिम, विक्रोळी, वडाळा, वर्सोवा व अन्य मतदान केंद्रांवर जाऊन तृतीयपंथींनी मतदान केले.
कागदपत्राच्या अपुऱ्या अभावामुळे कित्येक तृतीयपंथींना मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित रहावे लागले आहे. लोकप्रतिनिधी निवडण्याची ताकद आपल्या बोटात आहे. आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदान केल्याची भावना किन्नर माँ संस्थेच्या अध्यक्षा सलाम खान यांनी व्यक्त केली आहे.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *