143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी
ठाणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 साठी केंद्रिय निवडणूक निर्वाचन आयोगाने 143 डोंबिवली या विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून अम्रिता सिंह (एस.सी.एस) यांची नियुक्ती केलेली आहे.
143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या/नागरिकांच्या मतमोजणी विषयक काही तक्रारी असल्यास तक्रारदार हे 22 नोव्हेंबर 2024 पासून conobserver143@gmail.com या ई मेल आयडीवर तक्रार करु शकतात अथवा 9137335604 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करु शकतात.
अम्रिता सिंह (एस.सी.एस) यांचे संपर्क ठिकाण: बंगलो नंबर 5, सेंच्युरी रेयॉन कॉलनी, ए-टाईप, कल्याण मुरबाड रोड, शहाड, जिल्हा ठाणे या ठिकाणी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत प्रत्यक्ष भेटून तक्रार करु शकतात, याची नोंद घ्यावी, असे आवाहन 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी केले आहे.