कासा, ता : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी डहाणूतील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. मतमोजणी प्रक्रिया शनिवारी सेंट मेरी हायस्कूल, मसोली येथे पार पडणार आहे. यानिमित्ताने नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी अपेक्षित आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
वाहतूक बंदीचे ठिकाण आणि वेळ
सेंट मेरी हायस्कूलसमोरील मुख्य रस्ता (चेस्टकोर्ट हॉस्पिटल ते चंद्रानगर खाडी) वाहतुकीसाठी शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी पाचपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग
वाहने खालील मार्गाचा वापर करू शकतील :
प्रभूपाडा-शिपाईपाडा रोड
दुखीमाता चर्चमार्गे चंद्रसागर खाडी
सेंट मेरी हायस्कूलच्या मागील बाजूस रिलायन्स मॉलजवळील रस्ता
जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
अपर जिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेद्वारे मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, याची खबरदारी घेतली आहे. नागरिकांना दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
– जिल्हा प्रशासन, पालघर