मुंबई : मुंबईतील मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी मतदाराच्या मदतीसाठी सात हजार ११५ स्वयंसेवक मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर कार्यरत होते. यामध्ये ९८ महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) सहभागी दोन हजार ८०० विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) ७५० विद्यार्थी, नागरी संरक्षणातील ३२३ सदस्य, आपदा मित्र/सखी २००, नेहरू युवा केंद्राचे ३८ सदस्य आणि अन्य तीन हजार सदस्य यांचा समावेश होता.
निवडणूक आयोगाने प्रथमच १८ वर्षांखालील मुलांना स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मतदान केंद्रावर किशोरवयीन मुले मुली पाहायला मिळाली. या स्वयंसेवकांनी मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांना सहाय्य, रांगांचे व्यवस्थापन आदी जबाबदाऱ्या योग्यपणे पार पाडल्या. त्यामुळे मतदान प्रक्रियाही सुरळीत पार पडण्यास मदत झाली.
