दोन महिला ताब्यात
उल्हासनगर : अंबरनाथ पश्चिम मधील शंकर हाईट्स या इमारतीच्या परिसरात एका नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीवरून अर्भकाला फेकल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाईट्स फेस २ मधील ही धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटने ची माहिती इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्भकाला ताब्यात घेऊन शवविच्छेदना साठी शासकीय रुग्णालयात रवाना केले . अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपास करीत आहेत . या घटनेनंतर शंकर हाईट्स फेस २ मध्ये शोककळा पसरली आहे.
