मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणात चेतन पाटील आणि जयदीप आपटे यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील चेतन पाटील याला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.

२५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सल्लागार असलेल्या चेतन पाटील याला अटक करण्यात आली होती. चेतन पाटील यांनी केवळ पुतळ्याच्या पायाचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अहवाल सादर केला होता. पुतळ्याचा स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्ती न केल्यामुळे चेतन पाटील यांना या प्रकरणात गोवण्यात आलेले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *