अनिल ठाणेकर

ठाणे : दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता, सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे त्यात सातत्य ठेवले पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, असा संदेश आमदार संजय केळकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिला.

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम आयोजित करण्यात आलेल्या ४८ वी एन.टी.केळकर स्मृती आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शुक्रवारी सकाळी ठीक. ९.३० वाजता स्टार स्पोर्टस् क्लब आयोजीत ४८ वी एन.टी.केळकर स्मृर्ती आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगर पालिका पुरस्कृत,डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या सयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मढवी व भारत सरकार एनटीपीसी चे मा.संचालक ,टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष श्री विद्याधर वैशंपायन यांच्या हस्ते व स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व बाळाराम खोपकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. मी कॉलेज मध्ये होतो तेव्हा पासून ही स्पर्धा सुरू आहे. त्यावेळेला  शालिग्राम टूर्नामेंट म्हणून सुरू होती. मात्र कालांतराने ती बंद पडली. म्हणून रणजी प्लेअर, क्रिकेट मधील इतर दिगजनांना वाटले की ही स्पर्धा सूरु राहिली पाहिजे. येथील खेळाडूंना वाव मिळावा या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टूर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली. ४८ वर्षांपूर्वी ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आणि आज अखंडितपणे सुरू आहे.  या टूर्नामेंटचे वैशिष्ट्य असे आहे की आत्तापर्यंत साडेसातशे हुन अधिक खेळाडू हे राज्यासह इतर राज्यांसाठी तयार झालेले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास देखील ही स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे असेही केळकर म्हणाले. यात महापालिकेचे देखील सहकार्य लाभत आहे. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट पुढे गेला पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे हाच प्रमुख उद्देश ही स्पर्धा सुरू करण्यामागचा असल्याचे ते म्हणाले. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक खेळाडू पुढे गेले आहेत. नवीन खेळाडूंना आवाहन करेन की विकेटवर टिकता आले पाहिजे. दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल असेही संजय केळकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *