सिंधुदुर्गनगरी :’ बँकिंग सिस्टिम्स इंटेलिजन्स ‘ या जागतिक पातळीवर बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमार्फत दिला जाणारा ‘ ग्लोबल फिनटेक परस्पेक्टिव्ह ‘अंतर्गत बँकींग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा सर्वोत्कृष्ट ‘कोर बँकिंग सिस्टीम अंमलबजावणी ‘ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळाला आहे.
मुंबईच्या ताज हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभात इन्फोसिस चे संचालक बॉबी पारेख यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी दळवी यांचे सोबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,बँकेच्या संगणक विभागाचे सरव्यवस्थापक नितीन सावंत, व्यवस्थापक रघुनाथ परब हेही उपस्थित होते.
000000