रेवदंडा : येथील हरेश्वर मंदिर परिसरात असलेल्या श्री काळभैरव मंदिरात शनिवारी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी जन्मोत्सवाचे कीर्तन व धार्मिक विधी आयोजण्यात आले होते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी रांगोळीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. काढलेल्या रांगोळ्या लक्षवेधक ठरल्या. मैफल सप्तसुरांची या सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली. काळभैरव मित्र मंडळ व योगेश्वरी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
