अलीगड, उत्तरप्रदेश येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ सज्ज
धाराशिवचे भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे महाराष्ट्र संघाचे कर्णधार
मुंबई, दि. २४ नोव्हेंबर – २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान अलीगड, उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या ४३ व्या कुमार आणि मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुमार आणि मुली संघ रविवारी सकाळी प्रथमच विमानाने रवाना झाले. सदर स्पर्धा महाराणी अहिल्याबाई होळकर स्टेडीयम, अलीगड, उत्तर प्रदेश येथे आयोजित केली आहे.
धाराशिवचे भरतसिंग वसावे आणि सुहानी धोत्रे यांची अनुक्रमे कुमार आणि मुली संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच खेळाडूंना विमानाने प्रवासाची सुविधा मिळाली असून, याचे श्रेय संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव व त्यांच्या टीमला दिले जात आहे. विमान प्रवासाचा आनंद सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसत होता.
खेळाडूंनी ओम साईश्वर सेवा मंडळ, लालबाग येथे मुंबईत १७ नोव्हेंबरपासून आयोजित प्रशिक्षण शिबिरात कठोर मेहनत घेतली. यावेळी मंडळाचे श्रीकांत गायकवाड, नंदिनी धुमाळ, राजेश मोरे अस्मिता गायकवाड इ. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. स्पर्धेला रवाना होताना सर्व खेळाडू आनंदी व उत्साही दिसत होते. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले आणि खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे कुमार आणि मुली (ज्युनिअर) संघ पुढील प्रमाणे आहे.
कुमार गट: भरतसिंग वसावे (कर्णधार), सोत्या वळवी, विलास वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे (धाराशिव), प्रज्वल बनसोडे, प्रेम दळवी, पार्थ देवकाते (सांगली), कृष्णा बनसोडे, शुभम चव्हाण (सोलापूर), आशिष गौतम (ठाणे), चेतन गुंडगळ, भावेश माशिरे (पुणे), अनय वाल्हेकर (अहिल्यानगर), प्रतिक जगताप (सातारा), प्रशिक्षक: युवराज जाधव (सांगली), संघ व्यवस्थापक: आकाश लोखंडे (धाराशिव)
मुली गट: अश्विनी शिंदे, तन्वी भोसले, सुहानी धोत्रे (कर्णधार), प्रणाली काळे (धाराशिव), सानिका चाफे, प्रतीक्षा बिराजदार, धनश्री तामखडे (सांगली), प्राजक्ता बनसोडे, स्नेहा लामकाने (सोलापूर), दीक्षा काटेकर, धनश्री कंक (ठाणे), सुषमा चौधरी (नाशिक), दिव्या गायकवाड (मुं. उपनगर), रिद्धी चव्हाण (रत्नागिरी), जोया शेख (जालना), प्रशिक्षक: श्रीकांत गायकवाड (मुंबई), संघ व्यवस्थापिका: सुप्रिया गाढवे (धाराशिव) महाराष्ट्र संघ या राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
000