भिवंडी : भिवंडी शहरात दहा वर्षे आमदार म्हणून मी केलेल्या विकास कामांना पसंत केले म्हणून मला मतदारांनी पुन्हा संधी दिली ,या बद्दल मी सर्व मतदारांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार महेश चौघुले यांनी दिली आहे.ते शहर भाजपा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.यावेळी भाजपा शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील,निवडणूक प्रमुख शाम अग्रवाल,जेष्ठ नगरसेवक निलेश चौधरी,
सुमित पाटील,सुहास नकाते,शहर सरचिटणीस राजू गाजंगी,विशाल पाठारे,भारत भाटी,कल्पना शर्मा,अँड प्रवीण मिश्रा,पी डी यादव,अँड नंदन गुप्ता उपस्थित होते.
या निवडणुकीत सर्वधर्मीय जनतेने मला पाठिंबा दिला होता.केंद्र व राज्य सरकारच्या जनतेसाठी बनविलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ भिवंडी शहरातील लाखो लोकांपर्यंत पोहचवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो त्यामुळे हे यश मिळाले असून ,विकास झाला नाही म्हणून विरोधक आरोप करीत होते मी माझ्या पुढील पाच वर्षात अधिक विकास कामे करून विरोधकांना उत्तर देत पुढील पाच वर्षात अधिक जोमाने शहरातील नागरिकांची सेवा करीत राहणार असल्याचा विश्वास महेश चौघुले यांनी व्यक्त केला.
यावेळी शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील यांनी मतदारांचे आभार व्यक्त करीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिलेली बंपर विजयाने कार्यकर्त्या मध्ये उत्साह असून पुढील काळात पक्ष संघटना अधिक जोमाने समाजातील तळागाळापर्यंत पोहचेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सर्वांच्या वतीने शहराध्यक्ष हर्षल पाटील यांनी महेश चौघुले यांचा सत्कार करीत शुभेच्छा दिल्या.