मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने  २५  नोव्हेंबर २०२४ रोजी  वडाळा येथील मुंबई पोर्ट  प्राधिकरण रुग्णालयाच्या सॅनिटरी सेक्शनमध्ये ” आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मुलन दिन “.साजरा करण्यात आला अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई पोर्ट प्राधिकरण हॉस्पीटलच्या वरिष्ट्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती जया धिरवानी ,  वडाळा पोलीस स्टेशनच्या पोलिस सब इन्स्पेक्टर श्रीमती अमृता गारुळे , पोलिस कॉन्स्टेबल श्रीमती सोनाली शेडगे आणि सॅनिटरी सुपरवायझर श्रीमती सीमा क्रियेडो उपस्थित होत्या. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात  सांगितले की, महिलांवर अत्याचार होत असेल, तर त्याला निर्भीडपणे सामोरं जाऊन, आलेला हल्ला  परताऊन  स्वतःच संरक्षण करून घ्या. वडाळा पोलीस स्टेशनच्या पोलीस सब इन्स्पेक्टर अमृत्ता गारुळे  यांनी महिलांच्या कायद्याबद्दल माहिती दिली.सदर कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनच्या उपाध्यक्षा शीला भगत, सिस्टर इन्चार्ज श्रीमती रंजना आवटे ,अशोक डफळ,बाबुराव जाधव, ,सॅनिटरी सेक्शनमधील महिला आणि पुरुष कामगार,चालक मालक संघटनेचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते ,शाळेतील विद्यार्थिनी, कंत्राटी महिला कामगार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना शीला भगत आणि आभार प्रदर्शन अशोक डफळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सॅनिटरी सुपरवायझर  सीमा क्रियडो आणि त्यांच्या कामगारांनी सहकार्य केले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *