नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामांस नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे त्या अनधिकृत बांधकामांविरोधात अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर विभागात पाडकामाची धडक कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ए विभाग बेलापूर कार्यालयांतर्गत श्री. शांताराम महादू तांडेल, घर क्र. 839, करावे आणि सहदेव  तुकाराम भोईर, करावे गाव तसेच संगिताबाई चंद्रकांत पाटील, घर क्र. 836, करावे या ठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते.
सदर अनधिकृत बांधकामास ए – विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरुच ठेवले होते.त्यामुळे अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली.
या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. श्रीकांत तोडकर, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी – बेलापूर, कनिष्ठ अभियंता श्री. मयुरेश पवार यांनी विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या सहयोगाने 15 मजूर, 2 गॅसकटर – 2, 4 हॅमर यांच्या सहाय्याने ही कारवाई केली. याप्रसंगी अतिक्रमण विभागाकडील पोलीस तैनात होते.
यापुढे देखील अशाप्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *