अनिल ठाणेकर
ठाणे : समाजवादी नेते दशरथ पाटील यांच्या वक्तव्यानुसार, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हाच आदर्श मी राजकारणात वावरताना ठेवला आहे, असे मत माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी आपल्या वाढदिवशी बोलताना व्यक्त केले.
उमेश पाटील यांचा वाढदिवस, फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोलताशांच्या गजरात, भावभक्तिगीतांच्या वातावरणात आणि परिसरातील रहिवाशांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या माताभगिनिंनी व लाडक्या बहिणींच्या अलोट गर्दीत, केक कापून, अपूर्व उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवसेना उपनेते दशरथ पाटील, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, विभागप्रमुख शाम पाटील, विजय शिंदे, शहरप्रमुख नरेंद्र शिंदे, माजी नगरसेवक मनोहर साळवी, मनोहर डुंबरे, प्रकाश बर्डे, पवन कदम, रविंद्र पाटील, दिनेश कांबळे, मालती पाटील प्रमिला केणी, मिनल संख्ये, राधिका फाटक, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार, अपोलो जिमचे कमलाकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, काॅग्रेसचे राजू शेट्टी, सम्राजसेवक राकेश पाटील, रचना पाटील, जयदिप पाटील, सुनील गौरी तसेच पारसिक नगर, सह्याद्री सोसायटी व खारेगाव परिसरातील सोसायटीतील अध्यक्ष, सेक्रेटरी आणि पदाधिकारी व सभासद तसेच रहिवाशी ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी व लाडक्या बहिणींनी उमेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशिर्वाद देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
