स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत भारताच्या निवडणूक आयोगाने मतांवर दरोडा घातल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या रात्रीस चाललेल्या या खेळाचा नाना पटोले यांनी तर पर्दापाश केलाच पण भाजापच्या केंद्रयी अर्थमंत्री निर्मला सितारामन परकला प्रभाकर यांनीही सायंकाळी सहा वाजल्यानंतर झालेल्या ७६ लाखांच्या अतिरिक्त मतदानावरच प्रश्नचिन्ह उपस्तित केले आहे. संध्याकाळी पाच तासात ७६ लाखांचे मतदान होऊच शकत नाही याचा ‘काळ, काम आणि वेगा’चे प्रमेय मांडत प्रभाकर यांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्या उभे केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान, माजी मंत्री के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर डॉ. विश्वजीत कदम, आ. भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी मतांची आकडेवारी देत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावार चिन्ह उपस्थित केले, ते पुढे म्हणाले की, मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदारकेंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने