घोलाईनगरमध्ये १०० शौचालयांचे लक्ष्य पूर्ण, ठामपा आणि शेल्टर असोसिएट्स यांचा संयुक्त उपक्रम
अनिल ठाणेकर
अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव करून देऊन स्वच्छतेसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा उद्देशाने ठाणे महापालिका आणि शेल्टर असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात ‘एक घर एक शौचालय’ हा प्रकल्प राबवला जात आहे. घोलाई नगर, कळवा येथे या प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन करून जागतिक शौचालय दिन (१९ नोव्हेंबर) साजरा करण्यात आला.
उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्या मार्गदर्शनात कळवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या घोलाई नगर या ठिकाणी मागील काही दिवसांपासून या प्रकलपाची अमलबजावणी सुरू होती. या प्रकल्पांतर्गत लोकांनी घरात शौचालय बांधावे यासाठी संस्थेमार्फत मोफत शौचालय साहित्य पुरवले जाते. या प्रकल्पात १०० शौचालये बांधून पूर्ण झाली. जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने घोलाईनगर येथे छोटेखानी उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला. त्यानिमित्ताने, सजावट स्पर्धा, निबंध स्पर्धा यांच्यासह स्वच्छतेशी निगडित खेळही घेण्यात आले. त्यावेळी, कळवा प्रभाग समितीच्या मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया यांच्यासह शेल्टर संस्थेचे वैभव काळे, ज्ञानेश्वर आडे, योगिता शिंदे, पूजा भालेराव, कोमल इंगळे, समीक्षा राबाडे आदी उपस्थित होते.
0000