जरंडी गावातील घटना..

 

सोयगाव : चार चाकी वाहनाद्वारे  काळ्या बाजारात रेशन चा गहू,तांदूळ विक्रीसाठी घेऊन जाणारे अकरा क्विंटल धान्य संतप्त ग्रामस्थांनी  शुक्रवारी सकाळी अकरा वाजता चार चाकी वाहन अडवून जरंडी गावाजवळ पकडले दरम्यान वाहनांच्या मागे पुन्हा तीन मोटारसायकल वरही धान्य आढळून आल्या मुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे..
सिल्लोड तालुक्यात काळ्या बाजारात रेशन चे गहू तांदूळ धान्याच्या गोण्या विक्रीसाठी घेऊन जरंडी गावाजवळ संतप्त ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले दरम्यान ग्रामपंचायतने स्थानिक पंचनामा करून उपसरपंच संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, दिलीप पाटील यांनी सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी वाहनांसह तीन गोण्या गहू,सात गोण्या तांदूळ, अंगणवाडी पोषक आहार-दोन गोण्या,एक गोणी ज्वारी असे एकूण अकरा क्विंटल रेशनचे धान्य जरंडी गावातून जप्त केले आहे या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे जरंडी गावाकडून सिल्लोड कडे ओमीनी गाडी क्र-एम एच-४३,व्ही-६२८८ मध्ये व मोटारसायकल क्र-एम एच-२० बी व्ही-००८२,एम एच-२० ए व्ही-९४८२ आणि एम एच-२०,ए यु-९६७९  काही गोण्या दुचाकी वर रंगेहाथ पकडून  अफरोज हमीद शेख,समीर शेख हमीद, मिरज शेख खलील, जुबेर शेख(चारही रा शिवना ता सिल्लोड,)इकबाल तडवी(रा निंबायती ता सोयगाव),शेख नाजीम शेख चांद(रा सोयगाव)व इतर चार अश्या दहा जणांच्या ताब्यातून रंगेहाथ पकडले  दरम्यान सोयगाव पोलिसांना घटनेची माहिती देताच घटनास्थळी धाव घेत सदर रेशन चे गहू तांदूळ असे अकरा क्विंटल धान्य  सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तगत केले अद्याप सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *