गुणवंतांनाही केले सन्मानित
ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने नुकताच स्नेहसंमेलनाचा दिमाखदार सोहळा ठाणे शाखेच्या वतीने ज्ञानराज सभागृह ठाणे (पश्चिम) येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर, कार्यवाह डॉ. मारुती नलावडे, ठाणे जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिरीष नागले, संमेलनाध्यक्षा ज्योत्स्ना फडके, तुषार पारखी, भास्कर देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवानिवृत्त गुणवंत स्मिता पाटील, चंद्रकांत खामकर, माया सावंत, प्रिया खरबंदा, सुनीती सिन्नरकर यांना याप्रसंगी गौरविण्यात आले. तसेच सुषमा भागवत दिग्दर्शित “वाह ! गुरू” नाटकातील एक प्रवेश सादर करण्यात आला. दिपाली केळकर यांच्या “गप्पांच्या गावा जावे” या रंगतदार कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. रवी मोरे, मिलिंद भागवत, विकास कुंटे शिरीष सराफ, प्रताप जाधव, प्रकाश मोरये यांच्या बहारदार गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना शिर्के, अलका जोशी, घनश्याम दीक्षित यांनी केले.
00000