सावंतवाडी : सुमारे 500 वर्षांपूर्वीचा सावंतवाडी गंजीफा कलेचा वारसा सावंतवाडी संस्थांनचे राजमाता श्रीमंत सत्वशीला देवी भोसले आणि राजेसाहेब श्रीमंत शिवराम राजे भोसले यांनी जपून ठेवला होता. त्यांच्या पश्चात त्यांची डोर राणीसाहेब शुभदा देवी भोसले आणि युवराणीसाहेब श्रद्धा राजे भोसले यांनी सांभाळली आहे आणि या सावंतवाडीच्या गंजिफा कलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचवले आहे. यावर्षी १६ जानेवारीला भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री द्वारा ‘जीआयटी टॅग’ सावंतवाडी गंजिफा कलेला मिळालेला आहे.
ही गोष्ट सावंतवाडीकरांसाठी खूप गर्वाची आहे. ज्यांनी या पारंपारिक कलेला वेळोवेळी जतन करून या पारंपरिक गंजीफा कलेचा वारसा जपलेला आहे. सावंतवाडी गंजीफा कार्डला मिळालेल्या ‘जीआयटी टॅग’मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सावंतवाडी गंजीफा कार्डचा अस्सल सेट सावंतवाडी पॅलेस वर्कशॉप मधून मिळणार आहे,ज्यामुळे पर्यटकांची फसगत होणार नाही. हा सर्वात मोठा फायदा ‘जीआयटी टॅग’ मिळण्याचा आहे. वरील सर्व भौगोलिक मानांकन कायदेय प्रक्रिया मध्ये एडव्होकेट समीक्षा राजेंद्रकुमार दाभाडे यांनी पूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे व सावंतवाडी गंजीफा कलेला ‘जीआयटी टॅग’ मिळवून दिलेला आहे.