ठाणे : मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे युएन बारा भास्कर ट्रॉफीसाठी कल्याणमध्ये निवड चाचणी स्पर्धा होणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईमध्ये भास्कर ट्रॉफी सामने खेळवले जातात. या सामन्यांमध्ये प्रवेश घेणार्यांसाठी १-९-२०१२ किंवा त्यापुढे जन्म झालेले क्रिकेटपट्टू सहभागी होऊ शकतात. कल्याणच्या यंग असोसिएशन आणि युनियन क्रिकेट अकादमीसाठी ही निवड होणार आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते १० या वेळात युनियन क्रिकेट अकॅडमी, पोद्दार इन्टरनॅशनल शाळेसमोर, वायले नगर, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथील मैदानावर ही निवड चाचणी होणार आहे. तरी कल्याण परिसरातील किंवा ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंनी या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन युनियन क्रिकेट अकादमीचे तुषार सोमानी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२३८९०१८९
00000