डॉ. पराग अजमेरांच्या उपचाराला यश 

मुंबई  : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रवीण भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात प्रख्यात ह्रुदयरोग तज्ज्ञ डॉ. पराग अजमेरा यांना यश मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र मिशन पीस UN चे राजदूत दहिसर येथील प्रख्यात रेकी तज्ज्ञ डॉ. प्रवीण गोपालदास पुरेचा भाटिया यांना चक्कर आल्याने आणि उजवा हात व पाय संवेदनाहीन झाल्याने बोरिवली मुंबईतील अरिहंत हॉस्पिटलमधील इंटेसिव्ह कार्डियाक केअर युनिट (ICCU) मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या मुलाने त्यांना त्वरीत अरिहंत हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ पराग अजमेरा यांनी तपासणी केली आणि तपासणीत डॉ. पुरेचा भाटिया यांना सोडियमची पातळी कमी, हिमोग्लोबिन कमी, फॅटी लिव्हर आणि मेंदूला रक्तपुरवठा करण्यात अडथळा येत असल्याचे निदान केले. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर इंट्राव्हेनस औषधे दिली गेली. ते धोक्याबाहेर असले तरी अजमेरा यांनी त्यांच्यावर दीर्घकालीन उपचारांचा सल्ला दिला आहे. डॉक्टर पुरेचा भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात डॉ. पराग अजमेरांच्या प्रयत्नांना यश आले, उपचाराला प्रतिसाद मिळाला आणि आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु त्यांना विश्रांती घेण्याचा आणि पाहुण्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉ. प्रवीण भाटिया यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय जनता पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, भारतीय जनता पक्षाचे नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेकांना आपल्या अल्टरनेट मेडिसीन आणि रेकी यांच्या माध्यमातून उपचार केले आहेत.  ते सेंट्रल कौन्सिल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन इंडिया चे डायरेक्टर आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोपालजी मावजी पुरेचा यांचा वारसा लाभलेल्या डॉ. प्रवीण भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आल्या बद्दल डॉ. पराग अजमेरा यांचे दहिसर बोरीवली येथील नागरिकांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *