ठाणे :’ भूतलावर तन-मन-धन ओतून रेखाटलेली माझी रांगोळी अल्पायुषी आहे. उद्या ती पुसली जाणार आहे. याची जाण असुनही रंगावळीकार रांगोळ्या काढताहेत दुसऱ्याला नेत्रसुख देताना स्वत: कलाविष्काराचा आनंद या श्री आनंद भारती समाज सभागृहात लुटताहेत. माझी श्री समर्थ व्यायाम मंदिर व्यायामशाळा आगामी वर्षात शताब्दी साजरी करणार आहे. त्या निमित्ताने ठाण्याच्या कलाछंद कलाकारांनी दादरला रांगोळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करावे,’ असे मनोगज ७० वर्षीय जेष्ठ आंतराष्ट्रीय मल्लखांबपटू, प्रशिक्षक पद्मश्री उदय विश्वनाथ देशांपाडे यांनी व्यक्त केले.
रविवारी सायंकाळी श्री आनंद भारती समाज, ठाणे या संस्थेचे जेष्ठ रंगावलीकार, बॅण्ड वादक, गायक, श्री. रविंद्र (तुकाराम) का रांगोळीकार मंडळातर्फे आयोजित करण्यांत आलेल्या १४व्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पद्मश्री उदय देशपांडे बोलत होते.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हरेश्वर मोरेकर कार्याध्यक्ष ओमप्रकाश धिरोलिया, कार्यवाह संदीप कोळी, सहकार्यवाह सौ. माधुरी कोळी, अर्जुन पुरस्कार विजेती (मल्लखांब) हिमानी परब, कलाछंदचे अध्यक्ष सुभाष शाक्यवार ठाणे जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे कार्यवाह सतीश जाधव, रंगावलीकार ‘ठाणे गौरव’ प्रफुल्ल कोळी, सौ. भारती मोरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रल्हाद नाखवा यांनी सुत्रसंचालन केले. ‘पाऊस’ संकल्पनेवर आधारीत १८ रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन सायं. ५ ते १० दरम्यान शनिवार ७ डिसेंबर २०२४ पर्यंत विनाशुल्क खुले राहिल.
caption
रंगावालीकर रवींद्र ( तुकाराम ) कोळी 14 व्या रंगावली प्रदर्शनाचे उदघाटन करताना. सोबत मान्यवर. ( छाया : देवेशू ठाणेकर )
