अनिल ठाणेकर
नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलमध्ये मीनाताई ठाकरे स्टेडियमवर ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ या दरम्यान महाराष्ट्र राज्यस्तरीय खेलो इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत, नवी मुंबईतील सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उत्तम माने यांनी ६५+ वर्षावरील गटात सहभागी होऊन १ सुवर्ण पदक व ३ रौप्यपदक संपादन केली. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे ८३० खेळाडू सहभागी झाले होते, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.
उत्तम माने हे मुळचे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोंदी या गावचे रहिवासी असून ते नवी मुंबईत सानपाडा येथे स्थायिक झाले आहेत. उत्तम माने यांचे सद्या ७० वय असून तरुणांना लाजवेल अशी त्यांनी कामगिरी केली आहे. उत्तम माने यांनी हातोडा फेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे तर भालाफेक मध्ये रौप्यपदक आणि थाळी फेक मध्ये रौप्यपदक तसेच ४ x १०० मीटर रिले स्पर्धेत ही रौप्यपदक जिंकले आहे. नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांचे हस्ते पारितोषिक वितरण व स्पर्धेचा समारोप करण्यात आला.