अकोला : वंचित बहुजन आघाडीनेही आता  इव्हीएमविरोधात राज्यभरात एल्गार पुकारला आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हिएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हिएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. २००४ पासून ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हिएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ईव्हिएमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हिएम वापरामधील मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. ईव्हिएम च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय ही वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हिएमला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर आरोप केले जात आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमधील ट्रेंड इतका कसा बदलला? असा सवाल उपस्थित करत धक्कादायक आकडेवारीच मांडली आहे. तसेच हीव्हीपॅट मतमोजणीची मागणी देखील त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *