माथेरान : समस्त माथेरान करांचे ग्रामदैवत असलेल्या श्रीपिसरनाथ महाराज मंदिरात दि.३ रोजी महाअभिषेक व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी भाविकांनी गर्दी करून ग्रामदैवत श्री पिसारनाथ महाराजांचे दर्शन घेतले आणि भंडार्याचा लाभ घेतला.
शालू लेक जवळील स्वयंभू श्री पिसारनाथ मंदिरात दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते यावेळी पर्यटकांचं स्थानिक मंडळी त्याचप्रमाणे माथेरान वर अवलंबून असणाऱ्या तालुक्यातील असंख्य नागरिकांनी येथे हजेरी लावून कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. श्री पिसारनाथ महाभिषेक व भंडारा समिती माथेरान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.