मुंबई : स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि वृत्तपत्रीय कारकीर्दीचा झळाळता आलेख असलेले दिवंगत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीदास बोरकर यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त लक्ष्मीदास बोरकर जन्मशताब्दी समारोह समिती आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ डिसेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मुख्यमंत्री शपथविधी सोहळा दि. ५ डिसेंबर, २०२४ रोजी सायं. ६.०० वाजता आझाद मैदान येथे होणार असल्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित असल्यामुळे या भागात होणार्या सर्वच कार्यक्रमांना स्थगिती देण्याचे आदेश स्थानिक पोलीस स्टेशनमधून देण्यात आले आहेत. सबब सदर कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या आयोजनाची नवी तारीख लवकरच कळविण्यात येईल, अशी माहिती सोहळ्याचे संयोजक डॉ. नितीन बोरकर यांनी दिली.