माथेरान : माथेरान मध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दिव्यांग दिनानिमित्त माथेरान नगर परिषदेतर्फे दिनांक बांधवांना आर्थिक सहाय्य वाटप बुधवारी कम्युनिटी सेंटर येथे सायंकाळी ०४-०० वाजता कार्यक्षम मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी. माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर,दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव ,उद्योजक नितीन शहा, लेखापाल अंकुश इचके,भारत पाटील, सदानंद इंगळे,अमूधन, ज्ञानेश्वर सदगीर तसेच नगरपरिषद कर्मचारी वर्ग नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
0000000
