राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड तालुक्यात गेली 20 वर्षांपासून पत्रकारिते मध्ये काम करत ,समता सामाजिक फाउंडेशनआणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत संघाचे प्रदेश अध्यक्ष, वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सामाजिक काम करणारे, शांत संयमी, अभ्यासु पत्रकार शंकर करडे त्यांच्या कामाची दखल घेत,गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया, एशियन आर्ट सोसायटीच्या विद्यमाने 2024 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार गोवा राज्याची राजधानी पणजी येथील संस्कृती भवन येथे,माजी केंद्रीय राज्यमंत्री रमाकांत खलप यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
त्याप्रसंगी गोव्याचे आमदार रोडोल्फा फर्नांडिस, आरपीआय आठवले गटाचे,अध्यक्ष दिनेश उघडे, रमेश देसले, समाजसेवक भगवान भालेराव, दयानंद रातांबे, संतोष उघडे, ज्येष्ठ पत्रकार संजय बोरगे, तसेच देशातुन व राज्यातून मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन गोवा बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष डॉ.बी एन खरात,यांनी केले होते.
करडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्या बद्दल मुरबाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किसन कथोरे आणि वडखळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी त्याचें विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
०००००