ठाणे : प्राथमिक आरोग्य केंद्र, बदलापूर येथे जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ठाणे व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ४ डिसेंबर रोजी Cy TB चाचणीचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते व ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मुंजाळ आशा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र, ठाणेच्या डॉ. तरुलता धानके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कनोजा, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी वाणे तसेच सर्व बदलापूर क्षयरोग पथक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व आशा यांच्या उपस्थितीत Cy-TB चाचणी शुभारंभ कार्यक्रम पार पडला.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पॉझिटिव्ह क्षय रुग्णांच्या सहवासितांची Cy -TB चाचणी करण्यात आली. यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी प्रा. आ. केंद्रातील सर्व विभागास भेटी देऊन उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
जागतिक लोकसंख्येच्या 25 टक्के लोकांमध्ये सुप्त क्षयरोग असतो आणि 40 टक्के लोकसंख्या ही नंतर पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रूपांतरित होऊन तशा प्रकारचे आयुष्य जगते. हे रुग्ण इतरांमध्ये क्षयरोगाचा प्रसार करु शकतात म्हणून सुप्तावस्थेतच Cy-TB चाचणी करून निदान निश्चित करुन (TPT) TB Preventive Treatment टीबी प्रतिबंधक उपचार चालू करून क्षयरोगाचा प्रसार आपण थांबवू शकतो.
‘टिबी हारेगा देश जितेगा’ या घोषवाक्याने प्रेरीत होवून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे गंगाधर व जिल्हा क्षयरोग अधिकारी, ठाणे डॉ. मुंजाळ आशा यांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. जिल्हा क्षयरोग पथकाचे विशेष सहकार्य लाभले.
0000