मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांच्या योगदानाचे स्मरण करीत समानता, न्याय आणि बंधुत्वाच्या विचारांशी दृढ निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर चैत्यभूमी परिसरात आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनाची पाहणी केली. तसेच अन्नदानामध्ये सहभाग घेतला.