डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त

ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील सभागृहात ६ डिसेंबरला  उप मुख्य कार्यकारी (सा. प्र) अविनाश फडतरे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढा दिला असून आपले आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी खर्च केले आहे. आज जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य विषयक लाभ तसेच विविध योजना राबविण्याचे काम करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी ग्रामीण भागातील ग्रामस्थ कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाही यांची काळजी घ्यावी, असे उप मुख्य कार्यकारी (सा. प्र) अविनाश फडतरे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. बासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी दिवसातील १८ तास अभ्यास केला व कष्ट करून प्रत्येक घटकातील लोकांसाठी समाज कल्याणाची काम केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण आणि त्यांनी घेतलेली मेहनत आपण सर्वांनी लक्षात घेऊन तशी वाटचाल आपण केली पाहिजे, असे मार्गदर्शन मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी केले. माहिती शिक्षण संवाद तज्ञ प्रमिला सोनावणे यांनी भिम स्मृती गीत सादर केले तर सहाय्यक प्रशासन अधिकारी मनोर शेजवळ यांनी बुध्द वंदना सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. सहाय्यक प्रशासन अधिकारी मनोर शेजवळ, कनिष्ठ सहाय्यक सुनिता वाकसे, माहिती शिक्षण संवाद तज्ञ प्रमिला सोनावणे यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीना उजाळा दिला.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *