नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये हिवताप /डेंग्यु आजाराचा प्रसार रोखणेसाठी, मा. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन केले असता सदर सभांकरीता नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. भेटी दिलेल्या नागरीकांमध्ये हिवताप /डेंग्यु आजारांबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली.
तसेच कार्यक्षेत्रात जास्तीच जास्त नागरीकांपर्यंत पोहचुन जनजागृती करणे करीता दि. 06/12/2024 रोजी 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत विविध ठिकाणी जाहिर शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरांकरीता 11155 नागरीकांनी भेट दिली असुन, 1130 रक्त नमुने घेण्यात आले.
नमुंमपा कार्यक्षेत्रात हिवताप / डेंगी आजाराबाबत जनजागृती करणेकरीता दिनांक 03/08/2024 ते दिनांक. 06/12/2024 या कालावधीत एकुण 316 जाहिर शिबीरांचे आयोजन करण्यात आले असुन याचा एकुण 139843 नागरीकांनी लाभ घेतला असून, त्यामध्ये एकुण 12774 रक्त नमुने घेण्यात आले आहेत.
याशिवाय गणेशोत्सव कालावधी, नवरात्रोत्सव कालावधी व इतर धार्मीक कार्यक्रमांमध्ये देखील हिवताप / डेंगी आजाराबाबत जनजागृती करणे करण्याकरीता शिबीरांचे आयोजन करण्यात येते.
सदर शिबिरांचे वैशिष्टय म्हणून ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवुन, तसेच नागरीकांना डासांच्या आळ्या प्रत्यक्ष दाखवून, घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने उदा. पाणी साठवुन ठेवलेले ड्रम ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंधिस्त करणे, त्याबरोबर पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंधिस्त करणे व आठवड्यातुन एक दिवस स्वच्छ करुन कोरडे ठेवणे / भंगार साहित्य टायर्स इत्यादी नष्ट करणे / छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचु देवु नये व ताप येताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे या बाबत नागरीकांना प्रोत्साहित करुन, सदर बाबतीत आवाहन करण्यात आले.
तरी आरोग्य विभागाच्या कार्यवाही सोबतच नवी मुंबईच्या नागरीकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छता ठेवावे, घरातील डासोत्प्त्ती स्थाने नष्ट करावी, अजुबाजुचा परिसर / टेरेसवरील भंगार नष्ट केले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यु आजारावर आळा घालणे शक्य होईल, असे आवाहन मा. आयुक्त, डॉ. कैलास शिंदे, यांनी केले आहे.