सोयगाव : जरंडीचा उत्कृष्ट विकास आहे त्यामुळे जरंडी गाव आता सोलार वीज जोडणी करण्यासाठी प्रस्ताव पाठवून जरंडी गावात आता जिल्हा परिषदेच्या वतीने सोलार वीज पुरविण्यात येईल व गाव राज्यात रोल मॉडेल्स करू असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विकास मीना यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजता पाहणी दरम्यान व्यक्त केला
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विकास मीना यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजता अचानक जरंडी ग्रामपंचायतला भेट देऊन गावातील विकास कामांची पाहणी करून ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांची ग्रामस्थासमोर पाठ थोपटून समाधान व्यक्त केले दरम्यान आता पूर्ण गावाची सोलर वीज जोडणी करून राज्यात जरंडीचा आदर्श राबवून जरंडी राज्यभर रोल मॉडेल्स करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायत सरपंच स्वाती पाटील,उपसरपंच संजय पाटील, संजीवन सोनवणे यांनी जरंडी गावालगत असलेल्या डोंगरावर घनदाट वृक्ष लागवड साठी वनविभागाची आडकाठी येत असल्याचे सांगितल्या वर त्या संदर्भात वनविभागाशी बोलून वृक्ष संवर्धन साठी गावालगतचे डोंगर मोकळा करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत च्या कामांचा आढावा घेतला व हुतात्मा स्मारक, संगीत कारंजे,घनदाट वृक्ष लागवड, अभ्यासिका,नदी खोलीकरण, बाजार ओटे,तरुणांसाठी व्यायाम शाळा,जेष्ठ नागरिक कक्ष,गांडूळ खत प्रकल्प आदी उपक्रमांची पाहणी करून जरंडी पॅटर्न राज्यभर राबविण्यात येईल असे सांगितले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ गितेश चावडा, गटविकास अधिकारी दादाराव अहिरे,सरपंच स्वाती पाटील,उपसरपंच संजय पाटील, वंदना ताई पाटील, ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे,संजीवन सोनवणे, मधुकर पाटील,दिलीप पाटील, बनेखा तडवी,गणेश गवळी,भाऊसाहेब शेफ ,महिला बचत गटांच्या संध्या पाटिल,,वर्षा चौधरी, विद्या पाटील, शालू पवार,संतोष कुमार पाटील,सतीश बाविस्कर,रमेश दांडगे, राहुल दांडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहल वारंगणे, वैद्यकीय अधिकारी डॉ विशाखा डुकरे आदींची उपस्थिती होती.
00000