28 वी अजित नाईक स्मृती 14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा
फिरकीपटू निखिल गुरवच्या 6 विकेट
मुंबई: डावखुरा फिरकीपटू निखिल गुरवच्या (27 धावांत 6 विकेट) शानदार गोलंदाजीमुळे एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबने एमआयजी सीसी मैदानावर खेळल्या जात असलेल्या 28व्या अजित नाईक स्मृती निवडचाचणी 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या दोन दिवसीय उपांत्य सामन्याच्या पहिल्या दिवशी एमआयजी क्रिकेट अकॅडमीला पहिल्या डावात 53.4 षटकात 143 धावांवर गुंडाळले.
एमआयजी सीएच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली तरी निखिलच्या अचूक माऱ्यासमोर मधली फळी कोसळली. तरीही वेदांग मिश्रा (40 धावा), प्रदण्यांकुर भालेराव (34 धावा) आणि दर्शन ओझाने (30 धावा) थोडा संयम दाखवल्याने एमआयजी सीएने दीडशेच्या घरात झेप घेतली. एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबने पहिल्या दिवसअखेर 28 षटकांत 4 बाद 107 धावा करताना आघाडी घेण्यादृष्टीने आश्वासक सुरुवात केली. त्यात हर्ष कदमचे (46 धावांवर खेळत आहे) सर्वाधिक योगदान आहे.
सोव्हेनियर सीसी आणि इस्लाम जिमखाना यांच्यातील उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात सोव्हेनियर सीसीचा पहिला डाव 40 षटकांत 139 धावांत संपुष्टात आला. शिव त्रिपाठीने 39 धावा केल्या. अबरार शेखने 40 धावांत 4 आणि आदित्य पांडेने 35 धावांत 3 विकेट घेत छाप पाडली. पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपला तेव्हा इस्लाम जिमखान्याच्या ११ षटकांत ३ बाद ३९ धावा झाल्या आहेत. तिन्ही विकेट शिव त्रिपाठीने घेतल्या.
उपांत्य फेरी – संक्षिप्त धावफलक: सोव्हेनियर सीसी – पहिला डाव: 40 षटकांत सर्वबाद 139 (शिव त्रिपाठी 39; अबरार शेख 4/40, आदित्य पांडे 3/35) वि. इस्लाम जिमखाना – पहिला डाव: 11 षटकांत 3 बाद 39(शिव त्रिपाठी 3/11).
एमआयजी क्रिकेट अकॅडमी – पहिला डाव: ५३.४ षटकांत सर्वबाद १४३(वेदांग मिश्रा ४०, प्रद्न्यांकुर भालेराव ३४, दर्शन ओझा ३०; निखिल गुरव ६/२७) वि. एम. व्ही. स्पोर्ट्स क्लब – पहिला डाव : 28 षटकांत 4 बाद 107(हर्ष कदम खेळत आहे 46).
00000