एमसीसी 12 वर्षांखालील मुले टॅलेंट सर्च क्रिकेट लीग

मुंबई: अद्वैत केकणच्या (3 विकेट आणि 25 धावा) प्रभावी अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भोसले सीए संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित मुंबई सीसी अकॅडमी 12 वर्षांखालील मुले टॅलेंट सर्च क्रिकेट लीगच्या दुसऱ्या फेरीत एमसीसी ठाणे संघाविरुद्ध 7 विकेट राखून विजय मिळवला.
ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमसीसी, ठाणे संघाने 25 षटकांत 9 बाद 141 धावा केल्या. त्यात विराट निकुंभचे (64 चेंडूत 70 धावा) सर्वाधिक योगदान राहिले. अद्वैत केकणसह (20 धावांत 3 विकेट) क्रिस्टियानो बुथेलोने (३३ धावांत २ विकेट) छाप पाडली.
भोसले सीएने 142 धावांचे विजयी लक्ष्य 20 षटकांत 3 विकेटच्या बदल्यात पार केले. कियान पी.याने ४८ चेंडूंत ६१ धावा करताना विजय सुकर केला. अद्वैतने २५ धावा आणि एडहास स्वेनने नाबाद २१ धावा काढताना त्याला चांगली साथ दिली.
अन्य लढतीत, शिवसेवा संघाने स्पायडर सीसी संघावर ४२ धावांनी मात केली. सार्थक वसईकरचे (५० धावा) दमदार अर्धशतक त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
संक्षिप्त धावफलक: एमसीसी, ठाणे – 25 षटकांत 9 बाद 141 (विराट निकुंभ 70 (64 चेंडू), क्रिश शर्मा 22; अद्वैत केकण 3/20, क्रिस्टियानो बुथेलो 2/33) वि. भोसले सीए – 20 षटकांत 3 बाद 142 (कियान पी. 61 (48 चेंडू), अद्वैत केकण 25, एडहास स्वेन 21*; शार्दुल जोशी 2/18). निकाल: भोसले सीए 7 विकेट राखून विजयी. सामनावीर: अद्वैत केकण.
शिवसेवा – 25 षटकांत 9 बाद 156 (सार्थक वसईकर 50 (45 चेंडू); भूषण तुमाडे 2/19, आकाश मोरया 2/19) वि. स्पायडर सीसी – 25 षटकांत 5 बाद 114 (अनिल शर्मा 32, समर्थ जे. 24). निकाल : शिवसेवा ४२ धावांनी विजयी. सामनावीर: सार्थक वसईकर ५० धावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *