ठाणे : पाच दशकांहून अधिक काळ सामाजिक, विधायक कार्यात अग्रेसर राहणारे आणि लेखणीव्दारे वृत्तपत्रांतून समाजातील व्यथा, वेदना, समस्या आजही सातत्याने मांडत रहाणारे जेष्ठ वृतपत्र लेखक विश्वनाथ पंडित यांना मुंबईतील जॉय सामाजिक संस्था या प्रतीथयश संस्थेद्वारे पंडित यांनी अंगीकारलेल्या जीवनभर सामाजिक कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार समारंभपूर्वक बहाल करण्याची घोषणा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष गणेश हिरवे गुरुजी यांनी जाहीर केले. सदर समारंभ संस्थेच्या वर्धापनदिनी आयोजित करण्यात येणार आहे.